Saturday, 15 April 2017

आणि त्या गेल्या .....


काल घरी आले तेव्हा काकूंनी हाक मारली श्रुती!! ,मी विचारला काय झाला?? कानावर काही शब्द आले ,त्या सिरीयस आहेत काही सांगता येत नाही २४ तासात ,आणि पायाखालची जमीन सरकली लगेच धाव घेतला बघायला ,त्या श्वास घेत होत्या अखेरच्या काही तासांचा त्यांचा मुलगा त्यांच्या जवळ होता त्यांची काळजी घेत होता कसाही करून आपल्या आईला नीट करायचा ध्यास  होता मनी  ध्यानी त्याच्या...  नर्स हळूच काकूंना पुटपुटत होत्या लक्ष ठेवावा लागेल कधीही काहीही होईल ..हे ऐकलं आणि वाटलं ...संपला सगळं .....
ज्या आयुष्यासाठी खटाटोप केली ज्या मुलासाठी खटाटोप केली त्या साठी परत जागी  होण्याची धडपड त्यांना होत होती पण ...त्यांच्यावर त्यांचा आजार हावी होत होता ...
घरी आल्यावर खोलीत जाऊन डोळ्यांना थांबवता आले नाही ...त्यांच्या जागी स्वतःला ठेवून बघितला कसा वाटत असेल मरणाच्या दारी जीव किती कासावीस होत असेल .... त्या वेगळ आयुष्य जगल्या स्वतःसाठी नाही तर त्या मुलासाठी जगल्या ...पण असा का घडला त्यांच्या बरोबर ...कॅन्सर  हा आजार कसा जडला त्यांना आणि त्या आजाररूपी राक्षसाने त्यांना कसा हरवला....आपण कमकुवत आहोत का एवढे? की अश्या राक्षसांना जुमानतो आपण..
अजून हि आठवतंय मला त्या किती बोलायच्या कश्या हसायच्या .....मजबूत, खंभीर, रोल मॉडेल होत्या त्या ....ऐरोलीत बालोपासना जर कोणामुळे चालू झाली असेल तर त्यांच्यामुळे .... अखेरच्या दिवसापर्यंत त्यांना चमचमीत  तळलेलं पदार्थ खाण्याची हौस सुटली नव्हती ...नंतर प्रश्न पडला मी काय केला त्यांच्यासाठी ?? मी काय करू जेणेकरून त्या जगतील .... मनात खूप वाईट वाटले .....पण वाटलं कि जगव्यात.... पण अखेर ११ च्या सुमारास परत दारावरची बेल वाजली ...काकू होत्या बोलल्या तेच जे ऐकायची इच्छा नव्हती ...त्या गेल्या...